औरंगाबाद, दि. 03 जानेवारी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन ‘पेट‘चा निकाल सोमवारी (दि.एक) घोषित करण्यात आला आहे. पात्र विद्यार्थ्यांची यादी येत्या शनिवारी (दि.सहा) घोषित होणार आहे, अशी माहिती परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ.गणेश मंझा यांनी दिली.

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा वि़द्यापीठाच्यावतीने ऑनलाईन ‘पीएच.डी‘ एंट्रन्स टेस्ट शनिवारी (दि.३०) घेण्यात आली. ४२ विषयासाठी ११ हजार ७६८ जणांनी नोंदणी यापैकी ११ हजार १५४ विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते. तर ६१४ विद्यार्थी अनुपस्थित होते. गेल्या चार वर्षापासून रखडलेली पेट-५चा कार्यक्रम नवर्षांच्या पुर्वसंध्येला घोषित करण्यात आला. यावर्षीr पेट ऑनलाईन घेण्याचा निर्णय मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला. ३० जानेवारी २०२१ रोजी ‘पेट‘ पहिला पेपर ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात आला. १ पेâब्रुवारी रोजी निकाल घोषित करण्यात आला. ११ हजार १५४ विद्याथ्र्यांपैकी ५ हजार ६८८ जणांनी मराठीत तर २८४ संशोधकांनी हिंदी भाषेत परीक्षा दिली. तर ५ हजार १८२ विद्याथ्र्यांनी इंग्रजीतून पेपर सोडविला. यातील ११६ जणांना शून्य गुण मिळाले. तर १ ते ४४.५ टक्के दरम्यान ४ हजार २६३ गुण प्राप्त झाले. तर ४५ टक्के पेक्षा अधिक गुण मिळविणा-या विद्याथ्र्यांची संख्या ६ हजार ७७५ आहे. पहिल्या पेपरला पात्र झालेल्या विद्याथ्र्यांची यादी ६ पेâब्रुवारी रोजी घोषित करण्यात येणार आहे. खुला प्रवर्गासाठी ५० टक्के तर मागासवर्गीयासाठी ४५ टक्के ही उत्तीर्ण होण्यासाठीची अट आहे. २१ पेâब्रुवारी रोजी दुसरा पेपर घेण्यात येईल. तर २४ पेâब्रुवारी रोजी निकाल लागेल. दोन्ही पेपरचा निकाल २८ पेâब्रुवारी रोजी लागेल. प्रमाणपत्र वितरीत करण्यात येतील. पेट उत्तीर्ण तसेच संशोधनासाठी पात्र (सेट, नेट, एम.फिल, पाच वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आदी) विद्याथ्र्यांची नोंदणी मार्चमध्ये पीएच.डीसाठी नोंदणी तर एप्रिल महिन्यात संशोधन मान्यता समितीच्या बैठका घेण्यात येणार आहेत. ४२ विषयात ‘पेट‘ दुसरा पेपर होणार असून विषयनिहाय रिक्त जागा व गाईडची संख्याही प्रकाशित करण्यात येणार आहे.
    ‘पेट‘चा दुसरा टप्पा १ मार्च ते एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या टप्प्यात ‘पेट‘ उत्तीर्ण झालेले तसेच ‘पेट‘मधून सुट मिळालेले दुस-या टप्प्यात नोंदणी करण्यासाठी पात्र असणार आहेत. यामध्ये नेट, सेट, स्लेट, सीएसआयआर, जेआरएफ, गेट, जीपॅट, एफआयपी तसेच ‘सीईटी‘ मार्पâत प्रवेश घेऊन पदवी प्राप्त एम.फिल विद्याथ्र्यांना प्रवेश घेता येईल. १ ते १५ मार्च दरम्यान ऑनलाईन नोंदणी करता येईल. तर २० मार्च पर्यंत विद्यापीठात ‘हार्ड कॉपी‘ जमा करता येईल. तसेच एप्रिल महिन्यात संशोधन व अधिमान्यता समितीच्या आरआरसी बैठक होणार आहे, असे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी कळविले आहे.